Pradnya Malunjkar

Pradnya Malunjkar
PradnyA

Monday, June 13, 2011

मनाला भिडणारा तो पाऊस.....

रविवारी असेच मुंबई दर्शन केले
भूरभूर पाऊस नुकताच सुरु झालेला
ट्राफिक होती
नजर खिडकीतून बाहेर रोखलेली शून्यात
गाडीमध्ये पाउसाचे गाणे लावले होते
आणि अचानक गाणे बदलून
"सावन बरसे तरसे दिल
क्योंना घरसे निकले दिल " चे
मनाला भिडणारे सूर ऐकू येतात
आणि मग ते हरिहरनचे सूर घेऊन जातात परत मागे
चालत्या गाडीला कोणीतरी रिवर्स गियर टाकावा
आणि सुसाट घेऊन जावे तुझ्या गावाला तसाच काही तरी
आणि उलगडावी तुमची प्रत्येक आठवण
वाऱ्याने जशी पुस्तकची पाने आपोआप उलगडत जावी तशीच
बोटाला सुई मारावी आणि झरझर रक्त बाहेर यावे
असेच काही तरी गाण्याने केले होते
खूप दिवस झाकून ठेवलेले तुमच्या नावाची पाटी
एक दिवस पावसाने धुवून निघावी
आणि तुमचे नाव लख्ख दिसावं असाच काही तरी
परत तीच काळजात धडधड
म्हणूनच की काय निर्जीव झालेल्या मनाला
मातीचा दरवळलेला सुगंध ही जाणवू लागलेला.....
- प्रज्ञा मालुंजकर

No comments:

Post a Comment