Pradnya Malunjkar

Pradnya Malunjkar
PradnyA

Friday, March 9, 2012

वडील काय असतात कोणाला माहित आहे...

वडील काय असतात कोणाला माहित आहे का ?

वडील असतात आपला दुसरा खांदा...
तो खांदा कधीच आपली साथ नाही सोडत तो खांदा..

वडील असतात आपला दुसरा हाथ...
जो हाथ आपला कधीच वाईट काम न करून देणारा तो हाथ...

वडील असतात आपली एक बाजू ..
जी कधीच ती बाजू आपल्याल्या आपल्या संकटाना कधीच सोडत नाही ती एक बाजू ...

वडील असतात आपला एक मोठा आधार...
जो आधार कधी हि आपल्याला सोडत नाही....

वडील असतात आपला एक रस्ता ...
त्या रस्त्यावर आपल्याला ते चालवायला शिकवतात तो रस्ता ...

वडील असतात हातचे बोट ..
लहानपणापासून तेच बोट धरूनच आपण मोठे होते ..

वडिलांची माया जास्त करून मुलीवर असते...
कारण त्यांची मुलगी मोठी होऊन परकी होणार असते ते त्यांच्या मनात कायम असते ...

वडील असतात एक हळवे मन......
ते मन आपल्यावर जीवापाड प्रेम करते ते मन ....

वडिलांची हीच माया सर्वाना मिळो...
हीच ईश्वर चरणी प्रार्थना ....

- प्रज्ञा मालुंजकर....