माझ्या मनाची धडपड कोणीच नाही ओळखली
मैत्री
एक मुलगी होती साधी सिंपल स्वतःमध्ये गुंतून राहणारी ... स्वभाव तसा तिचा होता भोला, चंचल, तापड, राग येताच मागचा पुढचा विचार n करता लगेच तोंडावर बोलून टाकणारी ,,
पोटात तिच्या काही नसे मन खूप मोकळे असयाचे तिच्या भोळ्या स्वभावाचा खूप
जणानी वापर करून घेतला कामासाठी..पण तिला काळात नसे ती होती एक वेडी..लगेच काम करून टाकणार पण पैसे कोणी देत नसे असा तिचा वापर खूप लोकांनी केला
दिसण्यात साधी सिंपल.. वागण्यात पण साधी सिंपल... तिला मैत्री करायला खूप आवडत असे .. तिला चित्रकला, बुद्धीबळ, कादंबरी वाचण्यात फार रस असायचा...
कायम दुसर्यांचा विचार ती करत असे स्वताचा विचार मात्र तिने कधी केलाच नाही.... स्वतामध्ये कायम गुंतून असणारी ती मुलगी होती...
खूप वर्षापूर्वी ती नुकतेच जोब ला लागली ... तिने खूप काम केली... तिने त्या ऑफीस मध्ये सगळ्यांची मन जिकून घेतली ... जेव्हा तिला काम नसायचे तेव्हा ती आपली डायरी काढून नेट वरून कविता किवा स्टोरी लिहून घेत असे ... त्या काळात ओर्कुट खूप चालत होते .. तिला ते पण महित नव्हते कि ओर्कुट म्हणजे काय .. एकदा तिने तिच्या ऑफीस मधल्या तिच्या मित्राला विचारले ओर्कुट काय असते त्याने तिला सांगितले तिथून आपल्याला मित्र मैत्रिणी भेटतात.. त्याने तिला तीचे ओर्कुट प्रोफाइल उघडून दिले ..
तेव्हा तिला कलाले कि ओर्कुट दयारे आपण कोणलाही शोधु शकतो आणि मित्र मैत्रिणी बनउ शकतो....
हिला एक मैत्रीण पाहिजे होती जिला हिच्याकडे हि हिचे मन मोकळे करू शकेन .. पण हिला ओर्कुट मध्ये फक्त मुलांच्या रीक्येस्ट येत ase हि वैतागली हिला एकही मैत्रीण भेटली नाही म्हणून
आणि हि मुलांशी बोलत नसायची .. त्यांना उलट सांगायची कि आपण मराठी आहोत मराठीतून बोला .. तिला मराठीचा गर्व खूप होता... मुल बोलायची तू मुंबईत राहून सुद्धा तुला मराठीचा अभिमान आहे....
एकदा तिने तिच्या ऑफीस मधल्या मित्राला विचारले तुझ्या लिस्ट मध्ये तुझी कोणी चांगली मैत्रीण असेन तर सांग त्याने तिला सांगितले आणि एका मैत्रिणी ला ऑड कर असे तिला सांगितले हिने तिला लिस्ट मध्ये घेतले हिला खूप आनंद झाला कि मला आता एक मैत्रीण मिळाली म्हणून .. त्या दोघींची ओळख झाली आणि पहिल्याच चाट मध्ये त्या तिच्या मैत्रिणीने तिला तिचा फोन नंबर दिला .. हि बोलली पण तिला अग आपण आजच बोललो तू लगेच नंबर का दिला मला .. मग ती बोलली कि " माझे मन तू जिकून घेतलेस अशी मैत्रीण मला अजून पर्यंत नव्हती भेटली म्हणून तुला माझा नंबर मी दिला " हे तिचे बोलणे ऐकून हिला बरे वाटले .. ती मैत्रीण हिला ऑफीस सुटल्यावर फोन करत असे.. रात्री पण ह्या फोन वर एसएमएस चाट करत असे .. अशी दोन्घीची खूप जवळीक वाढली ... दिवसामागून दिवस जात होते ह्या दोघीनची मैत्री खूप घट्ट होत गेली ... हिचा एक मित्र होता तो मित्र तिच्या मैत्रिणीच्या गावचा होता..
आणि हिच्या मैत्रिणीचे लग्न करायचे होते म्हणून हिने त्याचे नाव तिला सांगितले आणि हिचा मित्र आणि हिची ती मैत्रीण एकमेकाशी चाट वर बोलू लागले.. त्या मित्राला हिची ती मैत्रीण
खूप आवडली म्हणून त्या हिच्या मित्राने त्या हिच्या मैत्रिणीला मागणी घातली .. हे तिच्या मैत्रिणीने लगेच हिला सांगितले कि तुझा मित्र माझा हाथ मागतोय काय करू... हि बोलली
घरच्यांशी बोल नंतर मला सांग ... नंतर काय झाले माहित नाही त्या मैत्रिणीने हिला त्या मित्राचे काहीच नाही सांगितले ... कारण त्या मित्राने त्या मैत्रिणीला सांगून ठेवले कि हिला प्रेमाबद्दल काहीच नको सांगू आपण हिला गिफ्ट देऊ... ase त्या डोंघांचे ठरलेय हे हिला माहित नाही ... हिने तिच्या मैत्रिणी ला विचारले काय हले तुमच्या दोन्घांचे..पण ती मैत्रीण हिला काहीच सांगत नसे .. मग हिने तो विषय काढलाच नाही.. एकदा त्या मित्राचा हिला फोन आला आणि त्याने हिला भेटायला बोलावले ....... पण हि कोणत्याच मुलाला भेटत नव्हती पण तिच्यामुळे हि भेटली कारण त्या मित्राने हिला अचानक फोन केला आणि चक्क भेटायला बोलवले म्हणून हि गेली .. तो भेटला पण त्या दोघांच्या प्रेमाबद्दल त्याने हिला काहीच नाही सांगितले .. हि घरी आली तिच्या मैत्रिणीला हिने फोने केला पण तिने फोने उचलला नाही.. दुसर्या दिवशी चाट वरती सुद्धा ती हिच्याशी बोलली नाही busy आहे असे हिला सांगितले.. पण ती मैत्रीण तिच्या मित्राबरोबर प्रेमाच्या गोष्टीवर बोलत होती हिला भोळी ला कळलेच नाही... हळूहळू ती मैत्रीण हिच्याशी कमी बोलायला लागली ओरडू लागली ... हि बिचारी घरी येऊन रडायची कि मैत्रीण ase का वागतेय नित बोलत सुद्धा नाही... नंतर त्या मैत्रिणीने हिला block केले हे हिला कळलेच नाही.. मग हिने त्या मित्राला विचारले कि ती online दिसत नाही फोन उचलत नाही .. काय आहे तो बोलला काहीच नाही... दिवाळी आली मित्राने हिला परत भेटायला बोलवले हि गेली नंतर त्याने हिला सांगिलते अग आम्ही तुला आमच्या प्रेमाबद्दल सांगायचे ठरवले नव्हते पण
तुला आमचा संशय आला म्हणून सांगतोय कि " हो आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो.. मी तुझ्या मैत्रिणीला भेटलो सुद्धा आमचे लग्न मोडले कारण आमचे देवक जुळले नाही आज तिचा साखरपुडा आहे plz तिला फोन कर तू तुझ्या mobile वरून ती तुझा फोन आता उचलेल " तो खूप रडत होता जीवापाड एकमेकांवर प्रेम करत होते... मग हिने तिला फोन केला तिने चक्क उचलला हिला खूप आनंद झाला कारण हि खूप दिवसांनी तिच्याशी बोलत होती.. आणि एका बाजूला दुख पण होत होते कि लग्न मोडले आणि आज तिचा साखरपुडा दुर्याच मुलासोबत होत होता.. ती मैत्रीण हिला बोलली तू मला नंतर फोन कर आता मी busy आहे..पण busy असल्याचे कारण तिने हिला सांगितले नाही ... बिचारा तिचा मित्र खूप रडत होता मग हिने त्या मित्राला समजून सांगितले जे नशिबात होते तेच घडते रडून काय उपयोग होणार नाही.. तो बोलला अग तुझ्यामुळे आम्ही भेटलो बोललो खूप स्वप्न पहिली आणि ती एका क्षणतच वाहून गेली ...हिने त्याला समजावले .. तो शांत झाला.. तिची मैत्रीण आणि हिचे ते शेवटचे बोलणे होते...
अखेर काय मैत्रीण बोलायची बंद झाली.... मित्राचे लग्न पण झाले दोघ खुश आहेत पण ...
एका मुला मुळे दोन मैत्रीणमधले बोलणे बंद झाले.... हिने एक मैत्रीण बनवली होती ती पण बोलायची बंद झाली आता ते दोघ त्यांच्या आयुष्यात खुश आहेत पण हि मैत्रीण बोलत नाही म्हणून अजून हि रडतेय ...
अखेर हे सिध्द झाले कि एका मुला मुळे दोन जीवापाड मैत्रीण मधले नाते कायमचे तुटले ..
शेवटी काय ती हिने जीव गुंतवला होता तिच्यात पण त्या मैत्रिणीला हिचे काहीच वाटले नाही ह्याचे दुख खूप होते हि स्टोरी वाचल्यावर...
Writer By- प्रज्ञा मालुंजकर
No comments:
Post a Comment